माजी राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिवीर

150 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

अमरावती/21 डिसेंबर -स्थानीय विद्याभारती कॅम्प, अमरावती मध्ये देशाची प्रथम महिला श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 19 डिसेंबर रोजी राष्ट्रीय योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि वाणिज्य विभागाचे संयुक्त विद्यमान े भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य डॉ.पद्ममाकर सोमवंशी, तर अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. पुष्पा जुनघरे, महेंद्र भुतडा, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एस. येनकर, सचिव डॉ. अशोक ग्रामीण, फार्मसी प्राचार्य डॉ. एस. डी. पांडे, श्रीमती प्रतिभाताई पाटील शिक्षणशास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. किशोर शिरभाते, जेम्स चे समन्वयक उपप्राचार्य एच.के. सिसोदिया उपस्थित होते. या शिबिरामध्ये 150 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

संबंधित बातम्या

Back to top button