सद्धर्म बुद्ध विहारास नववर्ष दिनी दहा हजार रुपयाची देणगी

अमरावती /19 जानेवारी : शहरातील मार्डी रोड येथील अतिशय आकर्षक व देखणे अशा सद्धर्म बुद्ध विहाराची वास्तु संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ सदैव अंध अपंगांच्या कार्यात सहकार्य करणारे सेवानिवृत्त बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी हर्षल बनसोड व सचिव पांडुरंग दंदे व सहकारी मंडळींनी उभारले आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची ही व्यवस्था तिथ करण्यात आली.
मित्र मंडळातील प्रभाताई आवरे यांनी सुचवल्या वरून मातोश्री कमलताई गवई सह मित्रांनी या वास्तूस भेट दिली. नववर्ष दिनी डॉ. गोविंद कासट मित्र मंडळाच्या यंदाच्या 27 वर्षातील विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथे संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षते खाली पार पडलेल्या नववर्षाची पहाट तपोवनात त्या कार्यक्रमात सद्धर्म बुद्ध विहारास दहा हजार रुपयाची देणगी देण्यात आली. या देणगीचा सद्धर्म बुद्ध विहार सचिव पांडुरंग नारायण दंदे यांनी मित्र मंडळातील ज्येष्ठ सदस्य पी टी इंगळे बाबूजी व मातोश्री कमलताई गवई यांच्या हस्ते स्वीकार केला. मंचावर चंद्रकुमार जाजोदिया सुदर्शन भाऊ गांग दिलीपपोपट उमा मामीजी करवा.

संबंधित बातम्या

Back to top button