2 घरफोडीत 90 हजाराची चोरी

अमरावती / 2 नोव्हेंबर – पोलीस आयुक्त परीसरातील 2 पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांनी घरावर हात साफ करुन जवळपास 90 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड झाली.
गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवार्पण कॅालनीमधील एका घराच्या कुलुप तोडून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. सदर फिर्यादी श्रीहुल अशोकराव धांडे (46) हे आपल्या कुटुंबासह लग्नाकरीता गेले त्याचदरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचा कडी, कोंडा तोडुन 3 बेडरूममधील लाकडी कपाटातून रोख 20 हजार रुपये व 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे असा एकुण 40 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना फिर्यादीच्या तक्रारीवरुन उघडकीस आली. तसेच राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील वृंदावन कॅालनीमधील रहीवासी सुरेश श्रीराम ठाकरे (73) हे सकाळी मॉर्निंग वॅाककरीता कुलुप लावुन गेले. मॉर्निंग वॉक करुन परतले असता समोरच्या दरवाज्याचे कुलुप, कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे चोरी झाल्याचा त्यांना पुर्णतः भास झाला. घरात जावुन पाहले असता बेडमधील सर्व सामान व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त आढळुन आले. यामध्ये जवळपास 50 हजार रुपयांचा माल चोरी गेल्याची तक्रार फिर्यादीने पोलीसांना दिली.

संबंधित बातम्या

Back to top button