74 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत
काहींच्या आशा पल्लवित

-अनेकांची झाली निराशा
दर्यापूर / 7 जुलै: दर्यापूर तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीचे 2025 ते 2030 सालासाठीचे सरपंचपदाचे सुधारित आरक्षण सोडत आज सोमवार (दि.7) रोजी दुपारी नवीन तहसील कार्यालयात नियंत्रण अधिकारी एसडीओ राजेश्वर हांडे, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे, नायब तहसीलदार प्रविण जमधाडे, महसूल सहाय्यक मंगेश टापरे, प्रफुल्ल बोरखडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
दरम्यान सर्वसाधारण सरपंच पदासाठी सर्वसाधारण 33, नागरिकांचा मागास प्रवर्ग 20, अनुसूचित जातीसाठीं 17, अनुसूचित जमातीसाठी 4 अशा पद्धतीने सरपंच पदासाठी एकूण 74 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या सरपंच पदाच्या सोडतीत अनेक फेरबदल झाले असून कभी खुशी कभी गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक मातब्बरांचे स्वप्न दुसरे आरक्षण निघाल्याने धुळीस मिळाले आहे. तर अनेकांना अनपेक्षित लॉटरी लागल्याचे चित्र दिसत आहे. एकूण 74 ग्रामपंचायतीपैकी 38 ग्रामपंचायतीवर महीलाराज असणार आहे.
-आरक्षण सोडत याप्रमाणे
अनुसूचित जाती,जमातीसाठी आरंक्षीत ग्रामपं़चायत : पेठ इतबापूर, शिवर बु., तेलखेडा, कळमगव्हाण, नाचोना, सांगळूद, लासूर, माटरगाव, बेबळा बु., कोळंबी, कान्होली, थिलोरी, टाकळी, करतखेडा, शिगणवाडी, चंद्रपुर, गौरखेडा या गावांचा समावेश झाला आहे. तर अनुसूचित जमातींच्या सरपंच पदासाठी घड़ा, एरंडगाव, टोंगलाबाद, गायवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग : येवदा, सासन रामापूर, वडनेर गंगाई, अडूळा बाजार, दारापूर, वढाळ गव्हण, शिंगणापूर, नांदरण, रामगाव, पिंपळखुट, आमला, नालवाडा, उमरी इतबारपूर, पिंपळोद, जसापूर, लोतवाडा, वडुरा, माहुली धांडे, सुकळी, भामोद. सर्वसाधारण प्रवर्ग : सामदा, इटकी, नरदोडा, उपराई, वरुड बु, धामोडी, घोडचंदी, चांडोळा, रुस्तमपूर, गोळेगांव, हिंगणी मिर्झापूर, मार्कडा, खैरी, नायगाव, महिमापूर, कळाशी, बेलोरा, खल्लार, आराळा, बोराळा, चंडीकापूर, नांदेड बु, सासन बु, जैनपूर, पनोरा, म्हैसपूर मोचडा, सांगवा बु., नरशिगपूर, रामतीर्थ, डोंगरगाव, लेहगाव, शिरजदा, ऊमरी ममदाबाद.




