56 वर्षीय इसमाकडून बालिकेचा विनयभंग

अमरावती / 4 जुलै: एका 56 वर्षीय वयस्कर व्यक्तीने 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेला आपल्या घरात बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दहीगांव येथे घडली. साहेबराव बापुराव चोपडे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी साहेबराव चोपडे आणि पिडित मुलगी शेजारी आहेत. बुधवारी सायंकाळचे सुमारास साहेबरावने या मुलीला घरातील लाईटची बटन सुरु करुन देण्याच्या निमित्ताने आपल्या घरात बोलाविले. ही मुलगी घरात आल्यानंतर साहेबरावने तिच्याशी लगट करुन अश्लिल चाळे केले आणि तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर लोणी पोलिस ठाण्यात जावून याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी साहेबराव चोपडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.




