21 गर्भवती मातांना मिळाले गर्भसंस्काराचे ‘आरोग्यम’
आरोग्यम मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलतर्फे ‘नेस्ट गर्भसंस्कार’ कार्यशाळा

अमरावती /3 फेब्रुवारी : मूल जन्माला आल्यानंतर त्यांची जडण-घडण करायची तर गर्भावस्थेपासून बाळावर संस्कार घालण्याचा संकल्प घेतला पाहिजे. कारण बाळाची जडण-घडण जन्माला आल्यानंतर नाही, तर गर्भावस्थेपासून सुरू झालेली असते. या विधानाला विज्ञानाने देखील पुष्टी दिलेली आहे. याच विज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात उपयोग करून गर्भवती मातांना आणि शिशुंना संस्कार देण्यासाठी आरोग्यम मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलद्वारे ’नेस्ट गर्भसंस्कार’ कार्यशाळेची मालिका यशस्वीपणे सुरू केली आहे. गर्भावस्थेतील जीवनशैली, आहार, व्यायाम व मानसिक शांततेचा वाढत्या बाळावर होणारा परिणाम शास्त्रीय पद्धतीने समजावून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
आरोग्यम हॉस्पीटलच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ. उर्वशी हातगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या कार्यशाळेमध्ये सहभागी सर्व गर्भवती मातांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, गर्भावस्थेतील प्रत्येक सामान्य समस्या चार दृष्टिकोनातून मांडण्यात आली. या गर्भसंस्कार कार्यशाळेला वैष्णवी मेहसरे (गर्भसंस्कार तज्ञ) यांचे मानसिक शांतता व भावनिक जडण-घडण मार्गदर्शन लाभले. डॉ. ऋतुजा शिंगरूप (पोषण आहार तज्ञ) यांनी पोषण आहार संबधी मार्गदर्शन तर योग तज्ञ डॉ. शिखा चावला यांचे व्यायाम व योग विषयावर मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. एक ते नऊ महिने दरम्यान चालणार्या या कार्यशाळेमध्ये पोषण आहार, व्यायाम, झोप अर्थात नेस्ट आणि सहपरिवार एकत्रित राहणे या विषयावर मार्गदर्शनपर भर देण्यात आला. या गर्भ संस्काराचे वैशिष्ट म्हणजे, गर्भसंस्कार गर्भवती मातांसाठी असले तरी या प्रक्रीयेमध्ये पती चा सहभाग हा गर्भवती मातांकरीता मानसिक व भावनिक आधार देणारा असतो. त्या अनुषंगाने गर्भवती मातांना देण्यात येणारे उपाय व मार्गदर्शन पती सुद्धा आत्मसात करीत असतो. जेणे करून गर्भकाळ ते प्रसुती दरम्यान पती-पत्नीची एकमेकांना मदत होईल. आरोग्यम मल्टीस्पेशालीटी आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती सोबतच भारतीय पारंपारीक वैद्यकीय पद्धतीचा अवलंब करीत आहे. ज्यामुळे रूग्नांना दुहेरी स्वरूपात योग्य व खात्रिशीर उपचार देत त्यांना निरोगी आरोग्य प्राप्त करता येईल. या वैशिष्ट्यपूर्ण गर्भसंस्कार कार्यशाळा उपक्रमाकरिता वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातून आरोग्यम मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व तेथील तज्ञ डॉक्टर चमुचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.




