10 जूनला नेत्रदान जनजागृती पदयात्रा

महापौर श्रीचंद तेजवानी यांची राहणार उपस्थिती

अमरावती /4 जून : डोळे नसते तर जीवन कसे असते हा विचार ही थरकाप उडवणारा आहे. परंतु अश्या भयावह अवस्थेत आपले अनेक बंधु जीवन जगत आहे परंतु त्यांच्या जीवनातही बदल येऊ शकतो. नेत्रहीन बांधव ही हे सुंदर जग बघू शकतील. परंतु हे घडू शकते नेत्रदानानेच.
10 जून विश्व नेत्रदान दिवस रोजी हरीना फाउंडेशन द्वारे नेत्रदानाच्या जनजागृतिसाठी आयोजित पदयात्रेत व पवित्र कृतज्ञता आयोजनात मी सहभागी होणार आहे. आपणही सर्वांनी अवश्य यावे असे भावनात्मक आवाहन महानगर पालिकेचे महापौर तेजवानी यांनी अमरावती वासियांना केले आहे. यावेळी त्यांनी स्वतः मेरे जीवन का अंतिम उपहार राष्ट्र के नाम अभियान अंतर्गत डोळे दान करण्याची शपथ घेतली,फुर्तिने नेत्रदानाचा संकल्प घेऊन या राष्ट्रीय सामाजिक कार्यात सहकार्य करतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.हरिनाचा मी जुना सदस्य आहे, या नात्याने हवे असे पूर्ण सहकार्याचे आश्वासनही त्यांनी दिले.10 जून रोजी अमरावती महानगर पालिकेच्या सर्व नगर सेवकांनी सामूहिक नेत्रदानाचा संकल्प केला तर सम्पूर्ण भारतात एक खुप मोठा सामाजिक संदेश अमरावती महानगर पालिकेच्या वतीने जाईल, आपण ह्या सामुहिक संकल्पासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती हरिनाचे अध्यक्ष मनोज राठी यांनी महापौर श्रीचंद तेजवानी यांना केली.

संबंधित बातम्या

Back to top button