झेंडूच्या फुलांच्या किंमतीत घसरण

दसर्‍याच्या तोरणांसाठी फुलांची रेलचेल

* शेवंती गुलाबाच्या दरात मात्र वाढ

अमरावती /19 ऑक्टोबर – दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या फुलबाजारात झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने त्याचे दर घसरून 20 रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे घरांवर तोरणे लावण्यासाठी आणि वाहनांची सजावट करण्यासाठी नागरिकांना स्वस्तात फुले मिळणार आहेत. दुसरीकडे पिवळी शेवंती 300 रुपये, पांढरी शेवंती 320 रुपये, कलर स्टार 300 रुपये आणि गुलाब 400 रुपये किलो दराने विकले जात आहेत. झेंडूचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी कमी भावामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे.
अमरावतीच्या फुलबाजारात जिल्ह्यातील विविध भागांतून झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दसर्‍याच्या दिवशी घरांच्या दारावर झेंडूची तोरणे लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या बाजारात झेंडूला मोठी मागणी आहे. पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडूची फुले अवघ्या 20 रुपये किलोने मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सजावटीसाठी कमी खर्च करावा लागणार आहे.फुलबाजारातील व्यापारी आणि उत्पादकांच्या माहितीनुसार, गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अमरावतीत झेंडूला अपेक्षित भाव मिळत नाही.

Back to top button