राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत 6 खेळाडू ठरले चॅम्पियन

350 खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग

* ट्रॅाफी देवून खेळाडूंचा करण्यात आला सत्कार

अमरावती / 9 मार्च जागतिक महिला दिन व श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील वॉरिअर्स स्पोर्ट्स अँड मार्शल आर्टस् अकादमी अमरावती कडून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विविध गटात 3 मुलांनी व 3 मुलीं चॅम्पियन ठरल्या.
6 वी खुली राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन रविवार रोजी इंडोअर स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल मार्डी रोड अमरावती येथे करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये 10 वर्ष, 12 वर्ष, 14 वर्ष, 17 वर्ष खालील मुले मुली व 17 वर्ष वरील मुले मुली यांनी काता व कुमिते गटामधे एकूण 350 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तसेच कराटे मधील ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मुले मधे प्रथम क्रमांक अभिषेक कडू, द्वितीय जय कारंजकर व तृतीय विशाल चव्हाण यांनी पटकाविला तसेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन मुली मधे प्रथम क्रमांक जानव्ही पोळ, द्वितीय प्रीति झरेकर व तृतीय क्रमांक संस्कृति गणेशकर हिने पटकाविला. या करिता प्रथम 5001, द्वितीय 3001, तृतीय 2001,पारितोषिक वितरित करण्यात आले. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सहभागी सर्वाधिक खेळाडू संघ या करिता प्रथम, द्वितीय व तृतीय टीम ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटक महापौर श्रीचंद तेजवानी, गटनेता चेतन गावंडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, नगरसेवक आशिष अतकरे, नगरसेविका सुरेखा लुंगारे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश जाधव, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, वैशाली इंगळे, त्रिवेणी बांते, प्रफुल डांगे, भाऊराव मोवळे, मनिष भसिन,नमिता तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन पार पडण्याकरीता मुख्य आयोजक सेन्सेई उमेश भा. मोवळे व सह आयोजक चेतन वाटणकर तांत्रिक समिती सदस्य विशाल चव्हाण, सागर मेश्राम, आशिष वाघमारे, जय कारंजकर, अभिषेक कडू, आदेश इंगळे, अखिलेश काळमेघ, शिशिर ढोक, आयुष चौधरी, कृष्णा वाघमारे, सार्थक घोंगडे, जिगर ठाकुर, स्वराज नाइकनवरे यांनी मुख्य भूमिका बजावली.

संबंधित बातम्या

Back to top button