विदर्भस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत अमरावतीकरांना आठ मेडल

अमरावती /23 फेब्रुवारी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित विदर्भ स्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत अमरावती जिल्हा खेळाडू व पालक असोसिएशनच्या तीस स्पर्धकांनी क्रीडा प्रशिक्षक अनिता कुर्‍हे व संजय डिप्टे यांच्या मार्गदर्शक भाग घेता या खेळाडूंनी एकूण आठ पदकांची कमाई केली.
वयोगट सहा वर्षे मध्ये प्रियांश प्रमोद खंडारे याने 30 मीटर धावणे व टेनिस चेंडू थ्रो मध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक 14 वर्ष वयोगटात रौनक रवींद्र अंबाडेकर याने थाळीफेक मध्ये रौप्य पदक पुरुष गटात निलेश वैद्य याने शंभर मीटर धावणे मध्ये सुवर्ण तर 40 वर्ष वरील मिश्र गटात निलेश वैद्य शितल वैद्य नीता खंडारे अमोल वानखडे यांनी शंभर बाय चार रिले मध्ये रोप्य पदक पटकाविले. नुकताच राजकमल चौकात या खेळाडूंचा लढ्ढा मॉल येथे सत्कार करण्यात आला तर चमू सोबत गेलेल्या पालक संजय डिप्टे यांचा शाल व पुस्तक प्रदान करून सत्कार करण्यात आला इतर खेळाडूंमध्ये संजय डिप्टे रोशनी मापार उन्नती खंडारे भव्य डिप्टे ईश्वरी वानखडे अश्विनी गवई राशी बडवाईक हर्षित ठाकूर कृष्णा चौधरी कार्तिक डिप्टे मयंक इंगोले चंचल कळसकर वीर वैद्य इंद्रायणी वैद्य व रूपाली अंबाडेकर हजर होते.

संबंधित बातम्या

Back to top button