एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड

मुंबई/10 नोव्हेंबर – मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या निवडणुकीतला मोठा सस्पेन्स अखेर आज संपला आहे. एमसीएच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनेक जणांनी अर्ज केला होता. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम क्षणी फार मोठ्या हालचाली घडल्या. त्यामुळे काही महत्त्वाच्या नेत्यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीचे आपले अर्ज मागे घेतले. यामुळे एमस ीएच्या अध्यक्ष पदाची निवडणूक ही बिन विरोध झाली आहे. एम सीएचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हेच पुन्हा एमसीएच्या अध्यक्षपदी नियुक्त होणार आहेत. इतर अर्जदारांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध होणार असली तरी इतर पदांची निवड होणे बाकी आहे. या पदांवर कुणाकुणाची वर्णी लागते ते पाहणं औत्सुक्याचं आहे.




