अ.भा. आंतर विद्यापीठ बेसबॉल (पुरुष व महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचे संघ घोषित

अमरावती /2 जून– श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाला युनिव्हर्सिटी, राजस्थान येथे 14 ते 17 जून, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल (पुरुष व महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ घोषित करण्यात आले आहे.
पुरुष संघ-चमूंमध्ये शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाचा पवन अवतिरक, वैभव पाठक, रुपेश बाकडे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा अभिषेक स्वर्गे, विशाल कांबे, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळचा दिपक गजभिये, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, भातकुलीचा स्वप्निल कुरवाडे, अंकुश नांदणे, साक्षात ढेंगेकर, भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा आकाश सोळंके, ओम सैरीसे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा अथर खान, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचा साहील तायडे, जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरचा करणसिंह राजपुत, रामकृष्ण महाविद्यालय, दारापूरचा अक्षद गवई, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीचा यश नन्नावरे यांचा समावेश आहे.
महिला संघ-महिला चमूंमध्ये महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, भातकुलीची कु. अंकिता हिवरकर, कु. गौरी खेतखेडे, कु.समृध्दी लोरे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. राधिका सिकची, कु. साक्षी भारस्कार, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. तेजस्विनी गुल्हाने, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची कु. प्राची कुचर, भारतीय महाविद्यालय, अमरावतीची कु. दिपाली ढोले, श्रीमती एन. आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, के.एन., अमरावतीची कु. साक्षी चाफलकर, श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, वनोजाची कु. नेहा बुंदेले, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगांव सुर्जीची कु. शिवानी वरखडे, जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरची कु. नंदिनी दीक्षित व कु. श्रृती मंडवाले, रामकृष्ण महाविद्यालय, दारापूरची कु. सलोनी शाहु, सरस्वती कला महाविद्यालय, दहिहांडाची कु. रिया डोंगरे, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसदची कु. हर्षदा बिहाडे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
पुरुष संघाचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे व महिला संघाचा प्रशिक्षण वर्ग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरणनगर, अमरावती येथे दि. 07 ते 11 जून, 2025 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button