नागपूर-मुंबई दरम्यान दिवाळी, छटसाठी स्पेशल ट्रेन सुरू
विदर्भातील प्रवाश्यांसाठी दिवाळीच्या गर्दीत सुविधा

* पुणे-नागपूर मार्गावरही विशेष सेवा
अमरावती /23 ऑक्टोबर – दिवाळी आणि छटपूजेसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने नागपूर ते मुंबई तसेच पुणे-हडपसर ते नागपूर दरम्यान विशेष ट्रेन सेवा सुरू केली आहे. या विशेष गाड्या प्रवाशांना सणासुदीच्या काळात सोयीस्कर प्रवासासाठी मोकळी जागा आणि सुरळीत सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत.
या विशेष सेवेंतर्गत 24 ऑक्टोबर शुक्रवार रोजी नागपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर स्पेशल ट्रेन क्रमांक 02140 धावणार आहे. ही ट्रेन नागपूर स्थानकावरून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि वर्धा, धामणगाव, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे या स्थानकांवर थांबे घेईल. या गाडीमध्ये तीन थर्ड एसी, दहा स्लिपर, सात सेकंड जनरल कोच तसेच गार्ड ब्रेक व्हॅन असतील.
त्याचप्रमाणे पुणे येथून नागपूरपर्यंत जाणारी स्पेशल ट्रेन क्रमांक 01202 हडपसर स्थानकावरून सुटेल. ही गाडी कॉर्ड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे घेईल. या ट्रेनमध्ये चार थर्ड एसी, सहा स्लिपर, सहा सेकंड जनरल आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन कोच असतील.
विदर्भातील नागपूर शहरातून मुंबईसह पुण्याच्या दिशेने दरवर्षी सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. विशेषतः नागपूरकर मोठ्या संख्येने मुंबईत शिक्षण, रोजगार आणि विविध कारणांसाठी स्थायिक असल्याने सणासुदीच्या काळात प्रवासासाठी गाड्यांवर गर्दी वाढते. त्याचप्रमाणे पुण्यापासून नागपूर आणि विदर्भ प्रदेशाकडे येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
मध्य रेल्वेने या दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या धाववून प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुकिंग करावे आणि प्रवासादरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळावेत, जेणेकरून सणासुदीच्या या आनंदाच्या काळात प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल. याशिवाय, प्रवाशांनी वेळापत्रक आणि थांब्यांविषयीची अधिक माहिती रेल्वे स्थानकांवर किंवा ऑनलाइन माध्यमातून घेतल्यास प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल.
* अमरावती-पुणे-अमरावती विशेष गाडीच्या फेर्या वाढवल्य
सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता विशेष गाडी
सोडण्यासह काही नियमित गाड्यांच्या फेर्यात देखील वाढ केली.
प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती – पुणे – अमरावती (गाडी क्रमांक
01404/01405 ) ही एक विशेष गाडी 8 ऑक्टोबर ते 26
नोव्हेंबरदरम्यान आठ फेर्या (दर बुधवार) चालविण्यात येत आहे. भुसावळ
विभागातून एकूण एक हजार 464 विशेष सेवा चालवल्या जात आहेत.
या गाड्या नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला
आणि बडनेरा आदी प्रमुख स्थानकांवर थांबतात. आतापर्यंत भुसावल
विभागातून 544 विशेष गाड्या चालवल्या गेल्या आहेत.




