एका मंगेशने दुसर्या मंगेशला संपविले

अमरावती/ 3 नोव्हेंबर : मित्रांची मैत्री खरी असली तरी एक मित्र दुसर्या मित्राला दारू पिण्यावरुन वाद निर्माण करतो आणि त्यातच एक मंगेश दुसर्या मंगेशला जीवाने संपवितो अशी घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा या गावात घडली. पोलीसांनी मृतक बहिणीच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक केली. नांदगाव खंडेश्वर तहसीलमधील मंगरूळ चव्हाळा शेडमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. ही घटना 4 दिवसांपुर्वी घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव मंगेश अशोक वानखडे (36) असे आहे. मृताची बहीण कल्पना प्रभाकर धोंगडे (28) यांच्या तक्रारीवरून मंगरूळ पोलिसांनी आरोपी मंगेश शंकरराव तिरमारे (36) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. हे दोन्ही मंगेश मित्र होते. या दोघांमध्ये दारू पिण्यावरून मोठ्या प्रमाणात वाद झाला. यामध्ये आरोपी मंगेश तिरमारे यांनी शुल्लक कारणावरुन मंगेश वानखडे याला मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यु झाला. यामध्ये मंगेश वानखडेच्या पोटावर आणि पाठीवर काठीचा मार झाला असल्याचे बोलल्या जाते.




