माजी सैनिक श्रीकांत शेगोकार यांच्या कमलताई गवई हस्ते सत्कार

अमरावती /30 मे: आपले सुपुत्र भूषण गवई यांच्या पदग्रहण समारंभातून म्हणजे सी जे आय च्या आई झाल्यावर अमरावतीत आगमन झाल्यावर कासट निवास एकनाथ पुरम येथे मातोश्री कमलताई गवई यांचा डॉ. गोविंद मित्र मंडळी व कासट परिवार तर्फे सत्कार घेण्यात आला. यावेळी मातोश्री यांच्या उपस्थितीचा लाभ घेता मित्र मंडळाच्या प्रथेनुसार कार्यक्रमात कार्यक्रमांतर्गत काही सत्कार घेण्यात आले.
त्यात मित्र मंडळातील माजी सैनिक अमरावती येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ या माजी सैनिकांच्या संस्थेची स्थापना करणारे श्री अंबादेवी संस्थान येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत व शाळा शाळातून विद्यार्थी वर्गात डॉक्टर इंजिनिअर वकील सीए इत्यादी क्षेत्राप्रमाणे सैनिकात युवा पिढी ने जावे त्यासाठी शरीर स्वास्थ चांगले राखावे असे प्रयत्न करणारे श्रीकांत शेगोकार यांचा मातोश्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तिरंगा रॅलीतही त्यांचा सत्कार झाला तसेच त्यांनी सैन्यात पुन्हा हा आजच्या परिस्थितीत आवश्यकता भासल्यास जायची तयारी पत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविले.
याप्रसंगी धीरूभाई सांगाणी सुदर्शन गांग डॉ. राजू डांगे वंदना डांगे संजीवनी वाट घनश्याम व मंजुश्री राठी सुरेश कस्तुरकर सतीश व उज्वला वडनेरकर एड. महेश बंग दिलीप सदार संजीवनी काळे प्राचार्य विवेक मोहोळ अमर भेरडे पी.टी गावंडे दिलीप सिंह खांबरे संजय खोंडे नवनाथ इंगोले डेटाराम मनोज प्रभाकरराव ढोमणे इत्यादी मंडळी हजर होती.

संबंधित बातम्या

Back to top button