तुमचा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल

शिंदेंच्या दिल्लीवारीचे रहस्य राऊतांनी उलगडले

मुंबई /26 ऑक्टोबर  :  नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की पक्ष, चिन्ह सुनावणीची तारीख जवळ आली की दिल्ली दौरे वाढतात; मालक दिल्लीत असल्याने शिंदेंना वारंवार दिल्लीला जावे लागते, असे ते म्हणाले. पक्ष चोरले, बहुमत चोरले तरीही न्याय हा सत्याच्या बाजूने लागेल; बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मोदी–शहांच्या 100 पिढ्या जरी आल्या तरी त्यांना चोरता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राऊत म्हणाले की, जेव्हा सर्वोच्च न्यायालयात ‘शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे?’ यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा त्यांचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीला जातात; रडगाणे गातात, छाती पिटतात आणि परत येतात. त्यांनी दावा केला की पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना आदेश दिला आहे की महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल. शिंदेंना त्यांच्या ‘मालकांशी’ चर्चा करावी लागते, कारण जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हा मातोश्री किंवा शिवसेना भवनावर येत होते आणि शिवसेना त्यांना कळत नव्हती; आता त्यांचे मालक दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांना तिकडे जावे लागते, असा टोळाही त्यांनी लगावला. राऊत म्हणाले की मोदी–शहांना शिंदेंची जमिनीवरील ताकद माहीत आहे आणि त्यांनी त्यांना महाराष्ट्राच्या तसेच मराठी माणसाच्या विरुद्ध वापरून घेतले आहे; त्यांनी असा दावा देखील केला की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर शिंदेंना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल आणि कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सर्वोच्च न्यायालयात आपला बचाव करू शकणार नाहीत; तसा प्रयत्न झाल्यास या देशातील नव्हे तर जगाच्या भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

Back to top button