मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का?

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुस र्याच दिवशी दावोस दौर्यावर गेले असून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्या्ंच्या दावोस दौर्याची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात असून हा केवळ देखावा असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला जाणे ही भाजपा महायुती सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची इव्हेंटबाजी आहे. यावर्षीही ही इव्हेंटबाजी सुरुच असून ज्या कंपन्यांशी करार करण्यात आले त्यातील काही कंपन्या मुंबईतील आहेत. मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार करण्याची गरजच काय? या कंपन्यांशी मुंबईतच करार करता आले नसते का?




