मोदी हात लावतात तिथे सोनं होतं

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले मोदींचे कौतुक

* महाविकास आघाडीवर सडकून टीका

नवी मुंबई/8 ऑक्टोबर : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज, 30 ऑक्टोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राम नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम करणारे उद्योजक गौतम अदाणी उपस्थित होते. उद्घाटन समारंभात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचे कौतुक करताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, जेव्हा जेव्हा मोदी महाराष्ट्रात येतात, तेव्हा मोठमोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होते. आठ वर्षांपूर्वी ग्रीनफिल्ड प्रकल्पाचे लोकार्पणही मोदींच्या हस्ते झाले. मोदींचा हात लागतो, त्याचं सोनं होतं, असे शिंदे म्हणाले. प्रत्येक विमान टेकऑफ आणि लँडिंग करत असतं, तसेच भारताला महाशक्ती बनवण्यासाठी 2014 साली मोदींनी टेकऑफ केला. त्यामुळे हे फक्त विमानतळ नाही, तर नव्या भारताच्या संकल्पासाठी मोदींचा महाराष्ट्रावरचा विशेष प्रभाव आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांनी पुढे म्हटले की, सर्वात लांब भुयारी मेट्रो 3 प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे, तर पहिल्या टप्प्याचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले होते. दोन ते चार वर्षांत सर्व मेट्रो लाईन सुरू होणार आहेत, ज्यामुळे महामुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास फक्त एक तास लागेल. शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत सांगितले की, फडणवीस मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प सुरू केले गेले, मात्र महाविकास आघाडीने अनेक प्रकल्पांमध्ये स्थगिती आणि अडथळे निर्माण केले. मोदींचा हात देणारा असल्यामुळे विकास कार्यात गती येत आहे. काँग्रेस आघाडीच्या भ्रष्टाचाराशी तुलना करत शिंदे म्हणाले की, काँग्रेसमध्ये करप्शन फर्स्ट आहे, तर मोदींच्या नेतृत्वाखाली नेशन फर्स्ट आहे. मोदी हे विकासाची आंधी आहेत आणि महायुतीच विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतल्यामुळे विजय मिळवेल, असे सांगत शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button