ओला दुष्काळ की शेतकरी कर्जमाफी?

मुख्यमंत्री दोन दिवसात मोठी घोषणा करणार

मुंबई/3 ऑक्टोबर -महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफीची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्री दोन दिवसांत मोठी घोषणा करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय. दरम्यान मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून भरपाईची मागणी तीव्र होतेय. राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देणारी ही मोठी बातमी असून, दोन दिवसांत मुख्यमंत्री शेतकर्‍यांना मदतीची घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानी झाल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दोन दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करतील अशीही शक्यता आहे. राज्यात अतिवृष्टीनं शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून लाखो हेक्टर पीक वाया गेले आहे. नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतजमीन वाहून गेल्याने पुढील पीक घेण्याचा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकलाय. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी विरोधक आणि शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button