संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला करायच नाही
शरद पवारांकडून एक घाव दोन तुकडे

-राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम
पुणे / 17 जून: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? चर्चेचे शरद पवारांनी केले एका घावात दोन तुकडे केले आहेत. भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही, असे पवार म्हणाले. संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला करायचं नाही, जे कोणी येत असतील तर त्यांच्याबाबत आमचे नेत विचारविनिमय करतील, असे पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजण्यास काही दिवस बाकी असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? ही चर्चा राज्यात सुरु आहे. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे मोठ विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. शरद पवारांच्या या ठाम भूमिकेमुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. संधीसाधुपणा करणार्यांना सोबत घेणार नाही, असे पवारांनी स्पष्ट सांगितले. त्यांच्या या एका विधानामुळे साहेब-दादा एकत्र येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही, असे पवार म्हणाले. संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला करायचं नाही, जे कोणी येत असतील तर त्यांच्याबाबत आमचे नेत विचारविनिमय करतील, असे पवार म्हणाले. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, अशा शब्दात शरद पवारांनी एकत्रीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
पवार म्हणाले, सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी मांडली.




