एमपीएससी अध्यक्षपदी विवेक भीमनवार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयो गाच्या अध्यक्ष पदी विवेक लक्ष्मीकांत भीमन वार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली आहे. भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 6 वर्षे किंवा 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल) ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. विवेक भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1-क) नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. अभय एकनाथ वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. विवेक भीमनवार यापूर्वी परिवहन आयुक्त होते. त्यावेळी नवीन नंबर प्लेटसाठी खूप प्रयत्न केले. तसेच अपघातमुक्त प्रवासासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.




