पूरग्रस्तांना वडेट्टीवारांनी दिले 6 महिन्यांचे वेतन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पूरग्रस्तांना एका महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र आता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी सहा महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेसच्या आमदारांनी सहा महिन्यांचे वेतन द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाने विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजय वडेट्टीवार यांच्याच्या या घोषणेबाबत प्रश्न विचारला आणि त्याचं अभिनंदन केले; मात्र राजकारण म्हणून या सर्व गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी नमूद केले.




