उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट!

ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई/3 ऑक्टोबर – भाजप अमीबासारखी आहे असं म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट झाले आहेत, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला. महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते आमनेसामने आल्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. फडणवीसांच्या या टीकेला आता ठाकरे गट किंवा स्वतः उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत गुरुवारी झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसह विविध मुद्द्यांवरून महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या या विखारी टीकेला भाजप नेत्यांनी जहरी प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंनी भाजपची तुलना अमीबासोबत केली होती आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर चहुबाजूंनी प्रतिहल्ला चढवला. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट झाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी भाजपवर आरोप करताना म्हटलं होतं की, भाजप म्हणजे अमीबा आहे, जो वेडावाकडा पसरतो आणि लागेल तिथे युती करतो. पण एकपेशी म्हणजे मीच. शरीरात गेला की पोट बिघडवतं, तसाच हा समाजात घुसला की शांती नष्ट करतो. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना सांगितलं की, भाजपचा सुशासनाशी काही संबंध नाही, ते फक्त निवडणुकीत फायद्याचा विचार करतात. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करून नुकसानग्रस्तांना प्रतिहेक्टर 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली.

संबंधित बातम्या

Back to top button