सकाळी उद्धव, संध्याकाळी फडणवीस शिवतीर्थावर

निमित्त बाप्पाचे, चर्चा राजकारणाची

-उद्धव-राज ठाकरेंची भावनिक भेट
मुंबई / 27 ऑगस्ट : श्रीगणेशाच्या आगमनाने मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. घराघरात बाप्पाचे दर्शन चालू असताना, राजकीय नेत्यांची भेटीगाठीही रंगतदार ठरल्या आहेत. आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचले, तर संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा झाला.
गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या घरी जाणे टाळणारे ठाकरे बंधू, गेल्या काही महिन्यांपासून जवळ आले आहेत. जुलैमध्ये वरळी डोम येथील मराठी विजय मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरें 20 वर्षांनंतर एका मंचावर आले. आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या नव्या घरातील शिवतीर्थावर दोन तास दर्शनासाठी थांबले. या भेटीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र येतील, अशी चर्चा जोर धरली आहे.
उद्धव ठाकरे निघून गेल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेले हे पहिलेच भेटीचे प्रसंग असल्याचे दिसून आले. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे कोणासोबत हातमिळवणी करेल याची चर्चा रंगतदार ठरली. आजच्या भेटीमुळे स्पष्ट झाले – गणपती बाप्पाचे आगमन फक्त धार्मिक नाही, तर राजकारणातही गती आणणारे ठरले. उद्धव, राज आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे मुंबईतील राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button