राज्यातील 29 सहाय्यक पोलीस आयुक्त-उपअधीक्षकांच्या बदल्या

सतीश कुलकर्णी, माधवराव गरुड अमरावतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी

मुंबई /14 ऑगस्ट : राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या 29 पोलीस अधिकार्याांची आज (14 ऑगस्ट) सायंकाळी बदली करण्यात आली आहे. गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी बदल्याचे आदेश जारी करताना बदली झालेल्या पोलीस अधिकार्यांलनी त्यांच्या नव्याने दाखविण्यात आलेल्या बदलीच्या जागी तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त- पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या 29 पोलीस अधिकार्याच्यिां बदल्या करण्यात आल्या. त्यात मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत आबाजी साळवे यांची पिंपरी-चिंचवड, शशिकिरण बाबासो काशिद यांची अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी, मनिषा सदाशिव नलावडे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस उपायुक्त, विजय शंकरलाल जैस्वाल यांची दहशतवाद विरोधी पथक, अजीत राजाराम टिके यांची सातारा ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, फोर्स वनचे पोलीस उपअधीक्षक सुनिल रामदास लाहिगुडे यांची मुंबई, मिरा- भाईंदर-वसई-विरारचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश शंकर माने यांची भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल विलास कोळी यांची गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश संजयराव कुलकर्णी यांची अमरावतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाण्याचे माधवराव रावसाहेब गरुड यांची अमरावतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, रोशन भुजंगराव पंडित यांची नागपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र रामचंद्र खाडे यांची अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस उपअधिक्षक, रायगड-रोहाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर यांची ठाणे, रविंद्र पांडुरंग चौधर यांची लातूर-चाकूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रशांत पांडुरंग संपते यांची लातूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधिक्षक, बीड-गेवराईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निरज बाजीराव राजगुरु यांची अहिल्यानगर-शेवगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button