…तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!

मुंबई – जर जातीभेद नष्ट करायचा असेल तर, तो प्रथम मनातून नष्ट करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित एका चर्चासत्रात बोलत होते. भागवत म्हणाले, सुरुवातीला याचा संबंध व्यवसाय आणि कामाशी होता. मात्र नंतर, समाजात शिरली आणि भेदभावाचे कारण बनली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त या चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रांत संघचालक अनिल भालेरावही व्यासपीठावर उपस्थित होते. जातिभेदाच्या समस्येवर भाष्य करताना मोहन भागवत म्हणाले, हा भेदभाव दूर करण्यासाठी, मनातून जातीभेद नष्ट करणे आवश्यक आहे. जर हे प्रामाणिकपणे केले तर 10 ते 12 वर्षांत जातिभेद संपेल. श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना भागवत म्हणाले की, संघाचे उद्दिष्ट भारताला त्याचे सर्वोत्तम वैभव परत मिळवून देणे आणि समाजाला सोबत घेऊन जाणे आहे.




