रात्र वैर्‍याची आहे; गाफील राहू नका

मुंबई/23 नोव्हेंबर -रात्र वैर्‍याची आहे त्यामुळे गाफील राहू नका मतदार याद्या तपासून पाहा असेही राज ठाकरे म्हणाले. थोडे दिवस थांबा भाषण सुरुच होतील. 11 वर्ष हा कोकण महोत्सव साजरा होत आहे. मला फक्त जाता जाता एवढीच गोष्ट सांगायची आहे की, रात्र वैर्‍याची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्या ज्या काही सुरू आहेत त्यावरती लक्ष ठेवा. मतदार खरी आहे खोटे आहे याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल असंही ते म्हणाले. जर आपण गाफील राहिलो तर हातातून गेली समजा असेही राज ठाकरे म्हणाले. थोडे दिवस थांबा भाषण सुरुच होतील असेही राज ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button