सरकारकडून पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती

मुंबई /16 मार्च – मध्य-पूर्वेतील युद्धजन्य स्थिती मुळे जगभरात तणावाचे वाता वरण आहे. अमे रिका- इस्त्रा यलने इराण विरोधात युद्ध पुकारले आहे. यामुळे इराणच्या सामुद्रधुनी मार्गे येणारे इंधन आणि गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. याचे पडसाद आता भारतात उमटायला लागेल आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राज्यातील एलपीजी टंचाईवर सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीची मागणी केली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यात आणि देशात गॅस टंचाई आहे. सरकारकडे इंधन आणि गॅस बाबतचे काय धोरण आहे, याची माहिती विरोधी पक्षाला मिळत नाही. सामान्य जनता तर यापासून दूरच आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी अशा कठीण परिस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली पाहिजे. सर्वपक्षीय बैठक बोलावून या संकटावर कशी मात करता येईल हे मांडलं पाहिजे. मात्र या सरकारच्या काळात कोरोना आपत्तीमध्ये जी परिस्थिती होती आताही तसेच ते वागत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. काँग्रेस नेते पटोले म्हणाले की, देशात एलपीजीची अडचण आहे, टंचाईची परिस्थिती आहे, हे सरकार का मान्य करत नाही. राज्यात गॅसचा तुटवडा आहे तसाच राज्य सरकारकडून माहितीचा देखील तुटवडा आहे. गॅसची कमतरता असल्याचे सरकार का कबूल करत नाही? असा सवाल त्यांनी केला. कोविड-19 काळात देशात सर्वकाही सुरळीत आङे, असेच सरकारकडून सांगितले जात होते, मात्र ऑक्सिजन आभावी लोकांचे जीव जात होते. सरकार कोणतीही माहिती देत नाही. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.




