मुख्यमंत्र्यांनी दादांना ‘आरसा’ दाखविला

पुण्याच्या जाहीर सभेत पहिल्यांदाच राष्ट्रवादी विरुध्द भाजपची कठोर टीका

पुणे/5 जानेवारी – राज्यात महापालिका निवडणूकीचे राजकारण तापत चालले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना आरसा दाखविला आहे. पुणे महापालिकेत सत्ता असतांना भाजपने काय केले असे टिकास्त्र अजितदादा यांनी अलिकडे सोडले होते.
अजितदादांच्या टिका भाजपला जिव्हारी लागली असून मुख्यमंत्र्यांनी थेट हल्ला चढविला. देवेंद्र फडणविस असं म्हणाले की, महापालिकेत सत्ता असतांना भाजपने शहराचा कायापालट केला असून जे आम्हाला कामाचा हिशोब विचारत आहे त्यांनी आधी स्वतःच्या कारकिर्दीचा आरसा पहावा. पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून त्यांची थेट लढत भाजप, शिवसेना युतीशी आहे. पुणे हे राज्याचे आर्थिक इंजिन असून मी जेव्हा मुंबई विकासाबद्दल बोलत होतो. तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढले. मात्र आज मुंबई बदलली आहे. याच धर्तीवर पुण्याच्या विकासाचा 11 कि.मी. लांबीचा मेट्रोमार्ग, समान पाणीपुरवठा आणि नदी सुधार प्रकल्पा सारख्या कामामुळे पुणे जागतिक दर्जाचे शहर बनेल. कात्रज चौक येथे आयोजित विराट सभेत मुख्यमंत्र्यांनी तुफाण बॅटींग केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री म्हणून कारभार पाहणार्‍या अजित पवारांच्या काळात शहराचा म्हणावा तसा विकास का झाला नाही असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

संबंधित बातम्या

Back to top button