निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस सेवेतून बडतर्फ

सातारा : फलटण येथे महिला डॉक्टर आत्म हत्या प्रकरणी संशयित पोलीस उप निरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. सातार्यातील फलटण येथे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात बदने याच्या नावाचा उल्लेख आल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून, पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. आत्महत्येस पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हा जबाबदार आहे.




