अखेरच्या क्षणी असले घोळ भविष्यात टाळावे

कोर्टानं आयोगाला सुनावले; गाईडलाइन्ससाठी डेडलाइन

* नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश

औरंगाबाद/2 डिसेंबर -निवडणूक आणि मतमोजणीमधील फेरबदलामुळे राज्य निवडणूक आयोग टीकेचा धनी बनला. आता कोर्टानं मतमोजणीची तारीख बदलावरून निवडणूक आयोगाला सुनावलंय. भविष्यात अशा चुका करू नका म्हणून औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला सुनावलंय. असा घोळ पुढच्या निवडणुकीमध्ये होऊ नये, यासाठी दहा आठवड्यात गाईडलाईन्स तयार करा असे निर्देश न्यायालयानं आयोगाला दिलेत.
नागपूर खंडपीठाचे आदेश कायम ठेवीत मतमोजणी आणि निकाल एकाच दिवशी करावे. 20 तारखेच्या मतदान होईपर्यंत एक्झिटपोल ही सादर करू नये, अशा सूचना औरंगाबाद खंडपीठानं केल्या आहेत. हा सगळं निवडणूक आयोगाचा प्रशासानिक घोळ आहे. 21 तारखेला राज्यातील सगळे निकाल द्यावेत. अखेरच्या क्षणी असले घोळ भविष्यात टाळावे याबाबत निवडणूक आयोगाने काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आलीय. औरंगाबाद खंडपीठाआधी नागपूर खंडपीठानं नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी बाबत निर्णय दिला होता. राज्यात आज काही भागात मतदान पार पडत आहे. काही ठिकाणी राज्यात 20 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होणार होती. त्यामुळे दोन्ही मतमोजणी एकाच वेळी घेण्यात यावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज नागपूर आणि औरंगाबद खंडपीठात सुनावणी झाली. आज झालेल्या निवडणुकीचा निकाल संपूर्ण निवडणूक झाल्याशिवाय जाहीर करू नका. निवडणूक सगळीकडे होत असताना केवळ काही ठिकाणांचे निकाल जाहीर केल्यास त्याचा परिणाम इतर निकालावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल आधी जाहीर केल्यास त्या निवडणुकीस न्याय मिळेल असे वाटत नाही, असा युक्तीवाद नागपूर खंडपीठात याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला होता.

संबंधित बातम्या

Back to top button