तर आम्हाला पक्ष बाजूला ठेवून लढावं लागेल

छगन भुजबळांचा इशारा

मुंबई /7 ऑक्टोबर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाविरोधात (जीआर) आक्रमक झाले आहेत. ते यावरून सरकार आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्यावर टीका करत आहेत, तर जरांगे देखील वेळोवेळी प्रत्युत्तर देत आहेत. छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांचा अभ्यास आणि शिक्षण काय आहे, आणि तो मराठ्यांचा नेता नाही, असे म्हटले आणि जोरदार हल्लाबोल केला.

छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन त्याविरोधात लढावे. ओबीसींवर हल्ला झाला आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करावे. तसेच, जर कोणी मराठ्यांना आवाहन करत असेल की ओबीसींना मतदान करू नका, तर त्याच रीतीने ओबीसींनाही एकत्र येऊन लढावे लागेल. त्यांनी स्पष्ट केले की आतापर्यंत पक्षाचा सीमा ओलांडला नाही, परंतु कोणी असे वागत राहिले तर ओबीसी नेत्यांनी आपल्या समाजाला आदेश द्यावा लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले की, मराठा समाज 54 टक्के, राज्यात सात टक्के आदिवासी, 13 टक्के दलित आणि मुस्लिम समाजही एकत्र झाल्यास एकत्रित आकडेवारी 74 टक्के होते. त्यामुळे ओबीसींना एकीने लढण्याचे आवाहन त्यांनी केले आणि ही रात्र वैर्‍याची असल्याचेही म्हटले.

संबंधित बातम्या

Back to top button