तर शेतकर्यांसाठी फक्त दोन हजार कोटी?
कुंभमेळ्यासाठी 14 हजार कोटी

* बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
* शेतकर्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
जळगाव /5 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या बच्चू कडू यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 14 हजार कोटी रुपये खर्च होतात, तर शेतकर्यांना फक्त दोन हजार कोटी रुपये का दिले जातात? शेतकरी मर्यादेसाठी पैसे नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बच्चू कडू म्हणाले, “आमचे लक्ष्य गुलाबराव नाही, आमचे लक्ष्य शेतकरी आहे. भाषणांत जे बोलले ते म्हणतात की पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढू, असे म्हटल्यावर एवढे वाईट वाटण्याचे कारण काय? जर तुम्ही सर्वसामान्य जनतेतून निवडून आलेले आहात, तर सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे येत आहे, त्यांच्याकडे जेवणालाही जाऊ.”
आज शेतकर्यांना गरज आहे, पंतप्रधानांनी 50 टक्के धरून नफा भाव देण्याचे सांगितले होते, मात्र सध्या फक्त 15 टक्के मिळत आहे. मग शेतकर्यांकडून काय अपेक्षा आहेत, हे स्पष्ट करावे. मनमोहन सिंग सरकारने 82 हजार कोटीची कर्जमाफी केली होती, तशीच देशातील शेतकर्यांची कर्जमाफी केली जावी, असेही त्यांनी आवाहन केले. नगरमध्ये एका शेतकर्याने आपले शेत पाहून आत्महत्या केली; त्याची कोणत्याही वडिलांना हृदविकाराचा झटका आला का, हे पाहून शेतकर्यांना योग्य मदत दिली पाहिजे, फक्त त्यांच्यावर वाईट बोलू नका, असेही बच्चू कडू म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणतात शेतकरी राजकारण करत आहे, तर अजित पवार म्हणतात की पैशाचं सोंग करता येत नाही. बच्चू कडू म्हणाले की, तुम्ही शेतकर्यांना दिलासा देण्याची ताकद ठेवत नसाल, पैसे द्याल तेव्हा द्या, परंतु बोलणे तरी चांगले ठेवा. आज शेतकर्याची अवस्था बिकट आहे; अतिवृष्टीमुळे एकीकडे शेती नष्ट झाली, तर दुसरीकडे भावही नीच आहेत. कापसाचे भाव साडेसहा हजार रुपये असून, विदेशातून कापूस आयात केला जात आहे, याचा शेतकर्यांवर परिणाम होत आहे. ट्रम्पच्या समोर शेपटी हलवण्याचा प्रयत्न करताना, आपल्याकडील शेतकर्यांची परिस्थिती दुर्लक्षित केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बच्चू कडू म्हणाले की, उद्या गुलाबराव पाटलांनी सांगावे की कापसाला, सोयाबीनला, केळीला भाव का मिळाला नाही; मग शेतकरी त्याची काय उपाययोजना करेल? आम्ही कोणावरही जात नाही, तुमचा धंदा नाही, पण एरंडोल भागाचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही आपल्या मतदारसंघातील पाणी, धरणे यासंबंधी शेतकर्यांना स्पष्ट माहिती द्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.




