समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील 6 ठार
भरधाव रुग्णवाहिकेने दिली धडक

जालना /29 डिसेंबर : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्यातील जामवाडी परिसरात ही घटना घडली आहे. रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा अपघात झाला. ट्रकला अपघात झाल्यानं ट्रकमधील सहा जण खाली उतरले होते. मागील बाजूनं येणार्या रुग्णवाहिकेनं धडक दिल्यानं सहा जणांचा मृत्यू झालं आहे.
ट्रकमधून एक कुटुंब नाशिकला निघालं होतं. ट्रकचा अपघात झाला होता, त्यातून ते कुटुंब कसाबसा जीव वाचवून उतरले होते. मात्र, मागून येणार्या रुग्णवाहिकेनं धडक दिल्यानं 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ट्रक नाशिकला निघाला होता, तर रुग्णवाहिका अहिल्यानगरला निघाली होती. ट्रकमधून खाली उतरलेल्या 6 जणांचा रुग्णवाहिकेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे.
जालना येथे समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिकेनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्यात समृद्धी महामार्गावरील जामवाडी जवळ ही घटना घडली. ट्रकला अपघात झाल्याने ट्रक मधील कुटुंब खाली उतरले असता पाठीमागून येणार्या म्बुलन्सने कुटुंबास चिरडले. यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.




