शिंदेंचा निर्णय बदलला, बच्चू कडूंना धक्का

मुंबई/14 ऑक्टोबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी मंत्रालयासमोर जागा उपलब्ध करून दिली होती. मंत्रालयाजवळील जनता दल सेक्यूलर (जेडीएस) पक्षाच्या कार्यालयाची जागा कमी करून, त्याच ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाला जागा देण्यात आली होती. मंत्रालयाशेजारील जीवन विमा मार्ग येथे जेडीएस पक्षाचे 909 चौरस फुटांमध्ये कार्यालय आहे, जी जागा राज्य सरकारकडून जेडीएसला देण्यात आली होती. त्यातील 200 चौरस फुट जागा जेडीएसकडे ठेवून उर्वरित 700 चौरस फुट जागा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहार जनशक्ती पक्षासाठी दिली होती. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय रद्द केला असून, प्रहार जनशक्ती पक्षाची जागा काढून घेतली आहे. फडणवीस यांनी जेडीएसला पूर्वीप्रमाणेच संपूर्ण जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button