शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये

94 लाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

मुंबई/21 जानेवारी – शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारकडून वर्षाला 6000 रुपये दिले जातात. दरम्यान, आता योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. झेडपी निवडणुकीआधी शेतकर्‍यांना मिळणार पैसे मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आली होती. पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेतदेखील शेतकर्‍यांना 6000 रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत 21 हप्ते देण्यात आले आहेत. 22वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. हा हप्तादेखील पुढच्या महिन्यात दिला जाणार आहे. दर चार महिन्यांनी या दोन्ही योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो. पीएम किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीत पुढचा हप्ता येईल. यामुळे पुढच्या महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीआधी येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही 5 फेब्रुवारीला होणार आहे. त्याआधी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे पुढच्या दहा दिवसात शेतकर्‍यांना 4000 रुपये मिळतील. राज्यात नमो शेतकरी योजनेचे एकूण 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत.या शेतकर्‍यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. केंद्र सरकारचे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आठ दिवसात राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल, असं सांगितलं जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button