29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर
मुंबई, पुणे, नाशिकचा महापौर ओपन महिला प्रवर्गातून

* 9 महापालिकांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण
* 15 महापालिकांमध्ये महिला राज
मुंबई /22 जानेवारी : राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची सोडत आज (22 जानेवारी) चक्राकार पद्धतीने काढण्यात आली. मंत्रालयात काढलेल्या या सोडतीत मुंबईत महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. राज्यातील 29 पैकी एक महापौरपद अनुसूचित जमातीसाठी, तीन अनुसूचित जातीसाठी, ओबीसींसाठी 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापालिकांचे महापौरपद आरक्षित आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणुका झाल्या आणि 16 जानेवारी मतमोजणी झाली. त्यानंतर महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची सर्वांना प्रतीक्षा लागली होती. या आरक्षणमुळे अनेकांना महापौर होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे 15 महानगर पालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित असणार आहे.
15 महापालिकांमध्ये महिला राज-राज्यातील 29 महिपालिकांसाठी आज महापौरपदाची सोडत जाहीर झाली. 50 टक्के महिला राखीव नियमाप्रमाणे राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला महापौर निवड झाली आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिला राज पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारण गटासाठी 17 महापालिकांची सोडत निघाली त्यातील 9 महापालिकांमध्ये महिला आरक्षण असणार आहे. 4 महापालिकां मधील महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. तर अनुसूचित जातींच्या महिलांसाठी दोन महापालिकेत महापौरपदाचे आरक्षणाली लॉटरी निघाली आहे.
महापालिका महापौर आरक्षण
महापालिका – प्रवर्ग
मुंबई – सर्वसाधारण
नवी मुंबई – सर्वसाधारण
नागपूर – सर्वसाधारण
अकोला – ओबीसी (महिला)
अमरावती – सर्वसाधारण
ठाणे – अनु.जाती (एससी)
मिरा-भाईंदर – सर्वसाधारण
कल्याण-डोंबिवली – अनु.जमाती (एसटी)
उल्हासनगर – ओबीसी
वसई-विरार – सर्वसाधारण
भिवंडी-निजामपूर – सर्व सा.(महिला)
पनवेल – ओबीसी
नाशिक – सर्वसाधारण
अहिल्यानगर – ओबीसी (महिला)
मालेगाव – सर्वसाधारण
धुळे – सर्वसाधारण
जळगाव – ओबीसी (महिला)
चंद्रपूर – ओबीसी (महिला)
पुणे – सर्वसाधारण
पिंपरी-चिंचवड – सर्वसाधारण (महिला)




