रेल्वेच्या तिकिट दरात 1 जुलैपासून वाढ
तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम

मुंबई / 24 जून: देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे नवीन नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेने केलेले बदल प्रवाशांच्या सोयीसाठी आहे असं रेल्वे मंत्रालयाने म्हंटलं आहे. रेल्वे मंत्रालयाने एसी, नॉन एसी, एक्सप्रेस गाड्यांमध्ये रेल्वेने 1 रुपये वाढ केली आहे. तर एसी क्लासमध्ये प्रती 2 रुपये किलोमीटर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू लांब पल्ल्याच्या धावणार्या रेल्वे प्रवाशांकरीता भाडेवाढीचा परिणाम देखील होणार आहे. जर रेल्वेतून लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर 14 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. एसी क्लाससाठी 28 रुपये मोजावे लागणार असून 500 किलोमीटरच्या रेल्वे प्रवासासाठी भाडेवाढ होणार नाही अशी रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली.
1 जूलै 2025 पासून तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी 10 जून रोजी रेल्वे झोनला माहिती दिली. त्यामुळे दलाल आणि अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे. इथून पुढे तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांना आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे तिकिट बुक करता येणार. म्हणजेच आधारकार्ड ओटीपी पडताळणीसाठी गरजेचे आहे.सामान्य प्रवाशांसाठी तात्काळ तिकिट बुक करता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं प्रवाशांनी म्हटले आहे.




