राहुल गांधी पळकुटे, तर ठाकरेंचा मनआक्रोश सुरू
फडणवीसांची जोरदार टीका

लातूर /11 ऑगस्ट : कथित मत चोरी आणि बिहारमधील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवरून लोकसभा आणि राज्यसभेतील इंडिया आघाडीचे एकूण 300 खासदार रस्त्यावर उतरले होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे पक्षाकडून राज्यातील भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनावर आता मुख्यमंत्री देवेंद्र इंडिया आघाडीबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विेशास नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केला आहे. त्या निवडणूक आयोगाने त्यांना (राहुल गांधी) चार पत्र दिली आहेत. तुम्ही जे बाहेर सांगत आहेत, ते याठिकाणी येऊन शपथेवर सांगा. यांची का हिंमत नाही? हे का जात नाही तिथे? का पुरावे देत नाहीत? असे प्रश्न उपस्थित करत फडणवीस म्हणाले की, रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, पळकुटे लोकं आहेत. यांच्याकडे काहीच नाही आहे. आपला जो रोज पराभव होत आहे, तो पराभव पचवता येत नाही, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, यांची अशी अवस्था आहे. त्यामुळे ते (राहुल गांधी) अशाप्रकारे वागत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्री चोरांचे सरदार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या प्रेमाची चोरी करतो. त्यामुळे लोकं आम्हाला मतदान करतात. पण त्यांनी लोकांच्या जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेश चोर आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागावं, हे आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैवं आहे. बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेलेचपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोट्याळ्यात कफन खरेदीतही चोरी केली. त्यातही पैसा कमावला. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना कफन चोरांचं सरदार म्हणून का? पण मला अशी भाषा वापरायला आवडत नाही. देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरे महाजनआक्रोश म्हणत आहेत, तर हा जनआक्रोश आहे का? असा प्रश्न विचारला असता. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा त्यांचा मनआक्रोश आहे, जनआक्रोश नाही आहे. जनतेला काही देणंघेणं नाही आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली, ही गोष्ट त्यांचं मन मानत नाही आहे. त्यामुळे त्यांचा मनआक्रोश सुरू आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.




