प्रज्ञा सातवांनी राजीनामा देऊन केला भाजपात प्रवेश
हिंगोलीतील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला

मुंबई/18 डिसेंबर – महाविकास आघाडीतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना फोडण्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यशस्वी ठरत असून आता भाजपाने हिंगोलीतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधान परिषदेवर काँग्रेसकडून बिनविरोध निवडून गेलेल्या प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावन कुळे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. बुधवार पासून (ता. 17 डिसेंबर) काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार प्रज्ञा सातव या भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, काँग्रेस नेत्यांनी या चर्चांना फेटाळून लावले. पण गुरुवारी सकाळीच सातव या विधिमंडळात हजर झाल्या आणि त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. हा राजीनामा दिल्यानंतर तासाभरातच त्यांनी भाजपामध्ये रितसर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी सातव यांच्यासोबत त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या मराठवाड्यातील पदाधिकार्यांनी भाजपा जाहीर प्रवेश केला. दिवंगत पती राजीव सातव यांचे गांधी परिवाराशी अत्यंत जवळचे नाते असतानाही प्रज्ञा सातव यांनी हिंगोलीच्या विकासाचे कारण पुढे करत भाजपात प्रवेश केले असल्याचे सांगितले आहे.
भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी म्हटले की, मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या परिवारात सामावून घेतले, यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. तसेच, माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, राजीव सातव यांचे हिंगोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसा यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा चौफेर विकास घडत आहे.




