राष्ट्रवादीकडून नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती

ठोंबरेसह मिटकरींना प्रवक्ते पदावरून हटवले

मुंबई/10 नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते भिरवकल्यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदावरून पायउतार करण्यात आले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर  आणि त्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यात अनेकदा वाद होताना दिसतो. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करताना रुपाली ठोंबरे-पाटील आणि अमोल मिटकरी यांची हकालपट्टी केली असून सूरज चव्हाण यांना मात्र अभय दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button