नवी मुंबई विमानतळ समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विेशास

* मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन
मुंबई /8 ऑक्टोबर : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, 8 ऑक्टोबर, पार पडलं आहे. हे मुंबई महानगरातील दुसरं मोठं विमानतळ असून, यामुळे नवी मुंबई परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला आणि विविध विषयांवर भाष्य करताना नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसते, असे सांगितले. तसेच, या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईला सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून ओळख मिळणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
विमानतळामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून, मुंबईसारख्या व्यस्त शहराला जमीनीखाली आणि उंच इमारतींमध्ये व्यवस्थापन करून पायाभूत सुविधा अधिक सुस्थितीत मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारने आयटीआयसह अनेक कॅलेंडर मधून नवीन प्रकल्प सुरू केले असून, यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजन, सॉलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन अशा नविन तंत्रज्ञानाच्या शिकलायच्या संधी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दि.बा. पाटील यांचा कार्यप्रेरणादायी अनुभव आणि जीवनातील योगदान आठवले, ज्याने उपस्थितांना प्रेरणा दिली.
मागील 12 वर्षांत नवी मुंबई विमानतळासाठी अनेक महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत. विमानतळाचा आकार कमळाच्या फुलाप्रमाणे असून, त्यातून संस्कृती आणि समृद्धीचा प्रतीकात्मक अर्थ व्यक्त होतो, असे आयोजकांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळ विकसित भारताचा आणि आधुनिक भारताच्या दृष्टिकोनाचा एक ठळक उदाहरण ठरत आहे.
* स्वस्तात विमानाचं तिकिट मिळू शकेल
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, जेव्हा देशातील छोट्या-छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभे केले जातात, तेव्हा हवाई प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होतो. त्यासाठीच लोकांना स्वस्त तिकिट मिळावे यासाठी उडाण योजना सुरू केली गेली आहे. उडाण योजनेच्या माध्यमातून लोकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत, असेही मोदी म्हणाले.
* मोदींचा काँग्रेसला थेट सवाल
देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार झाले होते. मात्र तत्कालिन काँग्रेस सरकारने परकीय शक्तींच्या दबावाखाली भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून परावृत्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात प्रश्न उपस्थित करत म्हटले की, ही कोणती परकीय शक्ती होती आणि कोणत्या व्यक्तींनी भारतीय लष्कराला हल्ला करण्यापासून रोखले, याचा खुलासा काँग्रेसने करायला हवा. पंतप्रधान मोदी हे वक्तव्य करताना तत्कालिन गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत थेट सोनिया गांधींवर गंभीर आरोप केले आहेत.




