कर्जमाफीची चौथी यादी जाहीर

राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकर्‍यांना दिलासा

मुंबई /22 ऑक्टोबर  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सहकार विभागाने गुरुवारी (दि. 22) कर्जमाफीची चौथी यादी प्रसिद्ध केली. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज खाती असलेल्या राज्यातील 1 लाख 15 हजार 697 पात्र शेतकर्‍यांचा या यादीत समावेश आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 16 हजार 246, तर पुणे विभागातील एकूण 30 हजार 247 शेतकर्‍यांचा समावेश आहे, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
यात बँकांनी योजना पोर्टलवर एकूण 31 लाख 17 हजार थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. या माहितीवर संगणकीय प्रक्रिया करून, आधारप्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 15 लाख 85 हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांमध्ये आतापर्यंत 13 हजार 275 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे तावरे यांनी स्पष्ट केले.यापूर्वी पहिल्या यादीत 16 लाख 96 हजार 201, दुसर्‍या यादीत 4 लाख 19 हजार 737 आणि तिसर्‍या यादीत 3 लाख 51 हजार 192 अशा एकूण 24 लाख 67 हजार 130 पात्र शेतकर्‍यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. आता चौथ्या यादीत एकापेक्षा अधिक बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या 1 लाख 15 हजार 697 पात्र शेतकर्‍यांची नावे आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

Back to top button