राज्यात 80,962 कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र शासनाचे नऊ कंपन्यांसोबत सामंजस्य करार

* 40,300 रोजगार निर्मितीची संधी युवकांना उपलब्ध
* विदर्भ, मराठवाडा व कोकणातील औद्योगिक विकासाला मोठी गती
मुंबई/19 सप्टेंबर – मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे नऊ कंपन्यांशी 80,962 कोटी रूपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले. या करारामुळे राज्यात 40 हजार 300 रोजगार निर्मिती होणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. गडचिरोलीत सुमेध टुल्स प्रा. लि. आणि हरिओम पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांमुळे 5,500 रोजगार उपलब्ध होणार असून 5,135 कोटींची गुंतवणूक होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएल अॅडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) प्रा. लि. तर्फे 5,440 कोटींची गुंतवणूक करून ‘क्रिटिकली अॅडव्हान्स्ड लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स’ उभारले जाणार आहे. यामुळे 5,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. वर्धा येथे रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि.चा 25,000 कोटींचा एकात्मिक स्टील प्रकल्प येणार असून यामुळे 12,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा 41,580 कोटींचा स्टेनलेस स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे तब्बल 15,500 रोजगार निर्माण होतील. याशिवाय चंद्रपूर, सातारा व नागपूर येथेही स्पंज आयर्न, ऑटोमोटिव्ह स्टील पार्ट्स आणि आयएसपी प्रकल्प उभारले जाणार आहेत. चंद्रपूर येथे आयकॉन स्टील इंडिया प्रा.लि. 850 कोटीची स्पंज प्रकल्पामध्ये गुंतवणूक करत असून यातून 1,500 रोजगार निर्माण होतील. वाई येथे फिल्ट्रम टोकॉम्प प्रा.लि. हे 100 कोटी रूपयांची ऑटोमोटिव्ह स्टील पार्टमध्ये गुंतवणूक करत असून याद्वारे 1,200 रोजगार निर्मिती होणार आहे. मूल येथे जी.आर.कृश्ना फेरो अलॉय प्रा.लि. हे स्पंज निर्मितीसाठी 1,482 कोटी रूपयांची गुंतवणूक करत असून यातून 500 रोजगार निर्माण होणार आहेत. तसेच मतदार यादी संदर्भात, आधी निवडणुकीत जुन्या मतदार यादीचा वापर करण्याचा विचार होता, परंतु आता 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेली यादीच अंतिम मानली जाईल, कारण मतदार नोंदणी ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. या नव्या मतदारांपैकी 1.96 लाख मतदार घरबदलामुळे एका मतदारसंघातून दुसर्या मतदारसंघात स्थलांतर करून नोंदणी केले गेले आहेत. सर्वाधिक वाढ पुणे (32,031), ठाणे (27,386) आणि मुंबई उपनगर (25,831) या जिल्ह्यांत झाली आहे. जुन्या मतदारांची सर्वाधिक नावे ठाणे (45,800), मुंबई उपनगर (44,172), पुणे (43,961), नाशिक (35,479) आणि जळगाव (26,639) या जिल्ह्यांत वगळली गेली आहेत. तर नव्या मतदारांची सर्वाधिक भर ठाणे (2,25,866), पुणे (1,82,490), पालघर (97,100), मुंबई उपनगर (95,630) आणि नागपूर (70,693) या जिल्ह्यांत झाली आहे. एकूण मतदारसंख्येच्या बाबतीत टॉप जिल्हे पुणे (90,32,080), मुंबई उपनगर (77,81,728), ठाणे (74,55,205), नाशिक (51,28,974) आणि नागपूर (45,96,690) आहेत. या वाढीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांसाठी राजकीय परिस्थितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, तसेच मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी व नव्याने नोंदणी प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.




