मुंबईत ठाकरे बंधूंना पवारांची साथ; 10 जागांवर तडजोड
अधिकृत यादी आज जाहीर होणार

मुंबई/28 डिसेंबर -आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता मराठी अस्मिता आणि अनुभवाची सांगड पाहायला मिळणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणार्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्याच्या राजकारणात ही आणखी एक मोठी उलथापालथ झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या पक्षाने सुरुवातीला 52 जागांची मागणी केली होती. मात्र, प्रदीर्घ चर्चेअंती अखेर 10 जागांवर तडजोड करण्यात आली आहे. उबाठा-मनसे आघाडीने राष्ट्रवादीला 10 जागा सोडल्या असून, या जागांवर राष्ट्रवादीचे वजनदार उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत. उमेदवारांची अधिकृत यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेवर गेली तीन दशके शिवसेना (संयुक्त) आपले वर्चस्व टिकवून होती. मात्र, पक्षातील फुटीनंतर यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. शिवसेना (उबाठा)चा आजही मुंबईतील मध्यमवर्गीय आणि मराठी मतदारांमध्ये मोठा प्रभाव आहे. तर दुसरीकडे मनसे म्हणजे राज ठाकरेंची आक्रमक शैली आणि तरुण वर्गातील आकर्षण युतीसाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतील ताकद मर्यादित असली तरी, काही विशिष्ट ईशान्य मुंबईसारख्या पट्ट्यांमध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आह




