बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव

धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग ‘असा’ करायचा छळ

नाशिक/16 एप्रिल- TCS कंपनीत धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या घटनेतील पीडित एक एक करत समोर यताहेत. पीडितांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत एक पुरुष कर्मचारीही पुढे येऊन गंभीर आरोप करत आहे. या पुरुषाला बळजबरी टोपी घालण्यात आली आणि नमाज पठण करण्यासाठी त्याला भाग पाडले. इतकेच नाही तर जर तुला बाळ हवं तर बायकोला माझ्याकडे पाठव असंही एका आरोपीने त्याला म्हटल्याचा दावा पीडित पुरुष कर्मचार्‍याने केला आहे.
एका 23 वर्षीय युवतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात तौसिफ आणि दानिश यांचीही नावे ऋखठ मध्ये समाविष्ट आहेत. दानिशने तिला बळजबरीने जवळ ओढत किस करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला लग्नासाठी मागणी केली. दानिशचा मित्र तौसिफ आणि एचआर निदा खान यांनी देवी देवतांबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. या घटनेच्या तपासासाठी एका महिला पोलीस अधिकार्‍याला सीक्रेट एजेन्ट बनून कंपनीत पाठवण्यात आले होते. या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये 5 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. अनेक महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारीनंतर या घटनेत एकूण 9 गुन्हे आरोपींविरोधात नोंदवले आहेत. दरम्यान, मी कट्टर शाकाहारी आहे मात्र नाइट शिफ्टच्यावेळी मला हॉटेलला घेऊन जात मला मांसाहार करण्यासाठी दबाव आणला गेला. मी नकार दिला तेव्हा माझ्यावर विनोद केले असंही पीडित पुरुषाने सांगितले. तौसिफने पीडित कर्मचार्‍याला त्याच्या घरी नेले होते. तिथे त्याला धार्मिक टोपी घालून नमाज पठण करायला लावले आणि फोटो काढून ऑफिसच्या ग्रुपवर बदनाम केले. जेव्हा या गोष्टीचा जाब विचारायला गेला तेव्हा तौसिफने टेबल फॅन त्याच्या अंगावर फेकला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. माझे वडील जेव्हा लकवाग्रस्त झाले होते तेव्हा तौसिफ, दानिश, शाहरूख आणि रजा मेनन या लोकांनी मला इस्लाम स्वीकार तुझे वडील ठीक होतील असं सांगितले. मी त्यांचे ऐकले नाही तेव्हा मला नोकरीवरून काढण्याचा कट रचला. मुख्य ऑफिसला खोट्या तक्रारी दिल्या असंही पीडित पुरुष कर्मचार्‍याने सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button