वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

मुंबई/26 ऑक्टोबर – काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 45 ओबीसी नेत्यांची बैठक मुख्यमंत्री यांनी घेतली होती. या बैठकीत जीआरमधील मुद्द्यावर चर्चा झाली. हैद्राबाद गॅझेटमधील भागात खऱ्या कुणबी समाजाच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र जीआरमुळे मिळाले, अशी वडेट्टीवार यांची मागणी होती. त्यांनी स्पष्ट केले की प्रशासनाने खोटे प्रमाणपत्र दिल्यास योग्य कारवाई केली जाईल आणि गरज पडल्यास पुन्हा चर्चा होईल, मात्र संभ्रम निर्माण करू नये आणि दोन समाजांना एकमेकांच्या विरोधात आणू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली जाईल. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली की, जीआरचा इतर भागाशी संबंध नाही आणि खर्‍या कुणबींना प्रमाणपत्र न देणे योग्य नाही. त्यांनी सवाल उपस्थित केला की, वडेट्टीवार मराठवाड्यात बोलले होते, तर आता विरोध का?

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सदिच्छा भेट होती, असे सांगितले. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहे आणि विरोधकांकडून महायुतीमध्ये आलबेल होणार नाही, अशी टीका केली जात आहे. बावनकुळे म्हणाले की, मोदींना भेटण्यात काही गैर नाही; उलट महायुती अधिक मजबूत होत आहे. संजय राऊत हे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

ओबीसी जीआरवरील वादासंदर्भात बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या या बैठकीत खऱ्या कुणबी जात प्रमाणपत्रावर आधारित जीआरवरून संभ्रम निर्माण होऊ नये. जर खोटे प्रमाणपत्र दिले गेले तर योग्य कारवाई होईल, परंतु खर्‍या कुणबींवर अन्याय होऊ नये.

* आंदोलना पुढे ढकला, बच्चू कडूंना फोन

नागपूर शहरात पोलीस आयुक्तांनी सुरक्षित शहर या अंतर्गत ऑपरेशन यु-टर्न सुरू केले असून, आज शहरात पाच वाहतूक पोलीस चौक्यांचे उद्घाटन झाले. हा उपक्रम चांगला मानला जात आहे. दरम्यान, बच्चू कडू, महादेव जानकर, अजित नवले आणि राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, मात्र त्यांना विनंती केली गेली आहे की, 28 ऑक्टोबरला मुख्यमंत्री बैठक घेत असल्यामुळे आंदोलनाचा विचार पुढे ढकलावा आणि शासनाची बैठक झाल्यानंतर पुढील दिशा ठरवावी. सोबतच चौघांशी फोनवर संवाद साधला गेला असून, त्यांना विनंती करण्यात आली आहे की, 28 तारखेला बैठकीत उपस्थित राहावे, कारण या बैठकीत शासनासोबत चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळेल. मुख्यमंत्री स्वतः या बैठकीत उपस्थित असतील आणि सर्व विषयांवर चर्चा होऊन, त्यांनी शासनाला दिलेल्या निवेदनांवर तोडगा निघेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button