शासकीय अधिकार्यावर गाडी घातल्यास मोक्का लावणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

*महसूली अधिकार्यांना मल्टी पर्पज व्हेकिकल देणार
पुणे /9 जून: प्रशासकीय अधिकारी आपले काम करत असतात. अवैद्य वाळू उत्खनन रोखण्यासाठी आणि कारवाई करण्यास जातात. त्यावेळी काही मस्तवाल लोक त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे अधिकार्यांवर गाडी घालणार्यांवर मोक्काची कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महसूल लोक अदालतीत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, अशा लोकांची मस्ती कमी करण्याचे काम आम्ही करू. त्यांना चक्कीत टाकून पिसू. त्यांचा मस्तवालपणा उतरवण्याची धमक आणि ताकत सरकार मध्ये आहे. आता सरकार हे प्रत्यक्ष कृतीत आणणार आहे. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी महसूली अधिकार्यांना मल्टी पर्पज व्हेकिकल देण्याचे मान्य केले आहे.