मी काय साधू संत नाही, तुम्ही मला मतदान करा

मी कामे करुन देईल, अजित पवारांचं आश्वासन

बारामती/21 नोव्हेंबर मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करुन देईल असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते.
माळेगाव मध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेले सगळं करणार, तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार असे अजित पवार म्हणाले. मागे झालं गेलं ते गंगेला मिळाले, आता नवी पहाट आहे. 1400 कोटीचे बजेट माझ्याकडे आहे. त्यातले तुम्हाला पैसे देईल. कुणीही संपत नसते, संकुचित विचार करू नका. मन थोडं मोठं ठेवा असे अजित पवार म्हणाले. माळेगाव सहकारी साखर कारखानाचे करोडो रुपये वाचवले. कारखान्यात उशिरा पर्यत थांबलो. मी माझा घराचा डबा खाल्ला असे अजित पवार म्हणाले. अर्थ खाते माझ्याकडे आहे. वाडपी तुमच्या समोर आहे, त्यामुळं तुम्हाला जास्त वाढणार बारामतीत बाहेरुन हजरो कोटींचा निधी आणला आहे. अर्थ खाते माझ्याकडे आहे. वाडपी तुमच्या समोर आहे, त्यामुळे ओळखीचा असल्यावर तो तुम्हाला जास्त वाढतो असे वक्तव्य राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आपल्या हातात आहे आपण काहीही करु शकतो. काहीही म्हणजे चांगलं असे अजित पवार म्हणाले. बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीच्या तावरे गटाने एकत्र येत स्थानिक आघाडी केली आहे.यानिमित्त आयोजीत केलेल्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मी उभा राहणार नव्हतो. मी आणि पवार साहेब एकत्र असताना कधी आम्ही हारायचो. माझ्या स्वप्नात देखील नव्हतं की, मी चेअरमन होईल. मी उतरलो तर संपूर्ण ताकतीन असे अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button