अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार

मुंबई / 12 सप्टेंबर : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घरात सध्या दिशा पाटनीचे वडील, निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पाटनी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसेच भिंतीवर चार-पाच फायरिंग केली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर तातडीने पोलिस फोर्स घराबाहेर तैनात करण्यात आला आहे. सलमान खानला धमकवणार्या गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला. तसेच संत आणि धर्मांविरोधात बोलणार्यांना परिणाम भोगावा लागेल, अशी उघड धमकीही दिली. पण, ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली आहे.




